आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:'पेनड्राइव्ह’ स्टिंग करणाऱ्यांचा शोध घेणार , केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतल्याचा महाआघाडी सरकारला दाट संशय

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे षड‌्यंत्र असल्याचे स्टिंग केल्याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गुरुवारी सभागृहात निवेदन करतील.

गिरीश महाजन प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुण्याच्या तपास अधिकारी एसीपी सुषमा चव्हाण यांना बोलावून घेण्यात आले. त्यांनी व मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सायंकाळी गृहमंत्र्यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी हे स्टिंग सभागृहात मांडून आघाडी सरकार हे विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षड‌्यंत्र रचत असल्याचे कथ्य (नॅरेटिव्ह) उभे करण्यात यश मिळवले आहे.

असे असेल गृहमंत्र्यांचे उत्तर : पेनड्राइव्हमधील माहिती खरी आहे की माॅर्फिंग, या स्टिंगमध्ये इतर यंत्रणांचा (केंद्रीय तपास यंत्रणांचा) सहभाग होता का याचा तपास करण्यात येईल, ज्यांनी स्टिंग केले त्यांना शोधण्यात येईल आणि गोपनीय सरकारी माहितीचा भंग केल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल करण्यात येतील.

शक्तीशाली एजन्सीचा वापर
१२५ तास रेकॉर्डिंग करायचं म्हणजे यात शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत. - शरद पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष
फडणवीसांच्या व्हिडिओला आज गृहमंत्री उत्तर देणार

बातम्या आणखी आहेत...