आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई देत असून उर्वरित ५०३ कोटी रुपयांची रक्कम पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (ता.१४) विधानसभेत दिली. कृषी विभागांतील बदल्यांना स्थगिती नसल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह इतर आमदारांनी मांडलेल्या २९३ च्या प्रस्तावाला मंगळवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, पीक विम्याचे ६३ लाख ११ हजार २३५ लाभार्थी आहेत. ५० लाख, ९८ हजार ९९ शेतकऱ्यांना २ कोटी ३५६ लाख भरपाई मिळाली आहे. अद्याप ५०३ कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम प्रलंबित असून ती पुढील १५ दिवसांत जमा होईल. सरकारने पीक विम्यासाठी केवळ एक रुपयांत नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी तीन हजार ३१२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार ३४२ कोटी रुपये बँक खात्यात जमा केले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतील दोन टक्केही खर्च झाले नाही, असे म्हणणे बरोबर नाही. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ६५ कोटी ८८ लाख रुपये म्हणजे ८० टक्के पैसे खर्च झाले आहेत. १०८ कोटी रुपयांचा दुसरा टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून ३१ मार्चपूर्वी हा निधी खर्च केला जाईल. या निधीतून ५८ कोटी, ४८ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. सत्तारांच्या भाषणावर विरोधकांचा आक्षेप : यावेळी सभागृहात माहिती देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी लिखित भाषण वाचून दाखविण्यास सुरुवात केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. अशाप्रकारे भाषण वाचून दाखविण्याची प्रथा नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
शेतकऱ्यांसोबत बैठक बुधवारी वनजमिनीचे पट्टे नावावर करावे, यासाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी होणारी बैठक बुधवारी (ता.१५) होणार आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा धारण करुन शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. भारतीय किसान सभेच्या वतीने लाँग मार्च सुरु करण्यात आला आहे. हजारोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालेल्या या मोर्चा प्रश्नी पवार यांनी प्रश्न उपस्थित करीत त्याची तातडीने दखल घेण्याची मागणी केली.

Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.