आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईतील अँटी करप्शन ब्युरोचा एक अधिकारी आणि त्यांच्या मुलाला दोन साड्या आणि दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. या लोकांनी ही लाच एका अपार्टमेंटच्या अध्यक्षांकडून घेतली. त्याच्या तक्रारीवरून ACB त्यांना पकडले आहे.
भरत काकड (वय 57) आणि सचिन काकड (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. भरत कांदिवली पूर्वेतील सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांच्या कार्यालयात काम करतात. दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीच्या मुंबई परिक्षेत्रात यंदा नोंदवण्यात आलेली ही सर्वात मोठी लाच आहे. तक्रारदार हा मालाड वेस्टमधील एसव्ही रोडवरील अपार्टमेंटचा अध्यक्ष आहे.
एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'अध्यक्ष त्यांच्या सोसायटीची स्ट्रक्चरल डागडुजी करण्यास परवानगी मिळावी यासाठी सहकारी सोसायटीचे उपनिबंधक कार्यालयात गेले होते. भरत काकड यांनी त्यांच्याकडे मंजुरीच्या बदल्यात लाच मागितली. त्यानंतर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यासाठी त्यांनी एसीबीकडे संपर्क साधला'
अधिकारी काही दिवसांत सेवानिवृत्त होणार होता
छापेमारीच्या वेळी एसीबीला कळले की हा अधिकारी काही दिवसांतच सेवानिवृत्त होणार आहे आणि तो त्याच्या मुलाकडून लाचखोरीचा व्यवहार करायचा. पीडित व्यक्तीने पैसे आणि साड्या अधिकाऱ्याचा मुलगा सचिनच्या हातात दिल्या होत्या. दोन साड्यांची किंमत 7 हजार 500 रुपये सांगितली जात आहे. या साड्या कारमध्ये लपवून ठेवल्या होत्या.
अटक केलेल्या अधिकाऱ्याच्या मालमत्तेची चौकशी केली जाईल
या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करण्यासाठी एसीबी अटक केलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करेल. एसीबीने लोकांना असे आवाहन केले आहे की अशा प्रकरणांबद्दल माहितीसाठी ते त्यांच्या टोल-फ्री नंबर 1064 वर कॉल करून माहिती देऊ शकता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.