आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:शेअर बाजाराची दोन वर्षांतील सर्वात मोठी घसरण

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजाराने शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी घसरण नोंदवली. सेन्सेक्स १३५ अंकांनी घसरून ५१,३६०.४२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीही ६७ अंकांनी घसरून १५,२९३.५० अंकांच्या पातळीवर आला. यासोबतच सेन्सेक्स-निफ्टीची दोन वर्षांतील सर्वात खराब कामगिरी दिसून आली. या काळात दोन्ही निर्देशांक ७ टक्क्यांपेक्षा जास्त कमकुवत झाले. सेन्सेक्समध्ये ३,९६० अंक आणि निफ्टीमध्ये १,१८५ अंकांची घसरण झाली. मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर एका आठवड्यातील ही त्यांची मोठी घसरण आहे. गेल्या आठवड्यात ९ जून रोजी सेन्सेक्स ५५,३२.२८ वर आणि निफ्टी १६,४७. १० वर बंद झाला. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेसह देशांच्या बँकांनी व्याजदरात वाढ केली.

बातम्या आणखी आहेत...