आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखानंतर शिवसेनेचे भाष्य, सुशांत प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकार बदनाम करणे हे भाजपचेच कारस्थान असल्याचा गंभीर आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृत्तवाहिनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते, त्याला महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात, हे सरकार बदनाम कराण्याचे मुख्य कारस्थान - संजय राऊत
  • महाविकास आघाडी सरकार पडत नाही म्हटल्यावर बदनाम करायचे असे विरोधकांनी ठरवले व भाजपच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून त्यांनी सुशांत प्रकरणात आघाडी उघडली

'एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांतसिंह हे निमित्त व त्या निमित्ताने सरकार बदनाम करायचे हे मुख्य कारस्थान. ते सुरूच आहे.' असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या 'रोखठोक' मधून सुशांत सिंह प्रकरणावरुन एका वृत्त वाहिनीत मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या एकेरी उल्लेखाचा विरोध केला आहे.

राऊत म्हणाले की,अभिनेत्याचा खून घडवून आणला व त्यात सिनेसृष्टी व राजकीय नेत्यांचे संगनमत आहे, असे ओरडून सांगणे हा तापलेल्या तव्यावर पोळय़ा भाजू इच्छिणाऱया गटारी पत्रांचा व वृत्तवाहिन्यांचा प्रचार साफ खोटा होता. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. ते कसेही करून पाडायचे. पडत नाही म्हटल्यावर बदनाम करायचे असे विरोधकांनी ठरवले व भारतीय जनता पक्षाच्या सर्वच प्रकारच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून त्यांनी सुशांत प्रकरणात आघाडी उघडली. असे म्हणत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

राऊत म्हणाले की, अर्णब गोस्वामी हे ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे प्रमुख. ते राजकीय नेत्यांचा, मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात, बदनामीकारक भाषा वापरतात, धमक्या देतात. सोनिया गांधींच्या बाबतीत त्यांनी हेच केले व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून आव्हानाची भाषा करतानाही त्यांना लोकांनी पाहिले. पण हे सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केलेला पाहून शरद पवारांचा संजय राऊतांना फोन राऊतांनी लिहिले की, हे सर्व पाहिल्यावर श्री. शरद पवार यांनी मला फोन केला, ‘‘एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते, तर संस्था असते.’’ ‘Institute’ असा उल्लेख त्यांनी केला. शेवटी त्यांनी प्रश्न केला, ‘‘मग सरकार काय करते?’’ पवार यांचे मत एका अनुभवी नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांतसिंह हे निमित्त व त्या निमित्ताने सरकार बदनाम करायचे हे मुख्य कारस्थान. ते सुरूच आहे.

बातम्या आणखी आहेत...