आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना उपचारात प्रभावी औषध ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणेंनी भायखळातील मेडिकलवर छापा टाकला. या काळ्या बाजाराविरुद्ध राज्यात मोहीम उघडण्याचा निर्णय घेतल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
4 ते 5 हजारांचे रेमडेसिवीरच्या मुंबईत 30 ते 40 हजारांना विकले जात आहे. सरकारने रेमडेसिवीरची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे शिंगणे म्हणाले.
आधार कार्डची सक्ती : राज्यात रेमडेसिवीर औषध विकत घेण्यासाठी आता डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन, कोविड पॉझिटिव्हचा रिपोर्ट, मोबाइल नंबर व आधार कार्ड दाखवणे बंधनकारक असेल, असे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. रेमडेसिवीरचा डोस दिलेल्या रुग्णांची नोंद त्यांच्या आधार कार्डसह ठेवणेही रुग्णालयांना बंधनकारक असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.