आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:कोरोना रुग्णाचे मृतदेह 12 तास वाॅर्डातच पडून, मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातला प्रकार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा व्हिडिओ रविवारी ट्विट केला, हा व्हिडिओ एका कोरोना रुग्णाने काढलेला आहे

मृत झालेल्या कोरोना रुग्णाचे मृतदेह वाॅर्डमध्ये चक्क १२ तास पडून असून मृतदेहाशेजारी इतर काेरोना रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात समोर आला आहे. रुग्णालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा व्हिडिओ रविवारी ट्विट केला आहे. यामध्ये मृत झालेल्या कोरोना रुग्णाचे शव प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळलेले आहे. ज्या काॅटवर मृतदेह आहे त्याच्या शेजारी इतर कोरोनाबाधित रुग्णावर उपचार चालू आहेत. गेले १२ तास हे मृतदेह इथेच असल्याचे त्या व्हिडिओत दावा केला आहे. हा व्हिडिओ एका कोरोना रुग्णाने काढलेला आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच राजावाडी रुग्णालयाने संबधित व्हिडिओ कधीचा आहे, ते तपासून पाहिले जाईल, असे जाहीर केले आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगूनही नातेवाईक तो नेण्यास येत नाहीत. त्यामुळे थोडा वेळ जातो. विलंब होत असल्यास मृतदेह शवागरात ठेवतो. इतका वेळ वाॅर्डात ठेवले जात नाही, असा खुलासा रुग्णालयाच्या अधीक्षका डाॅ. विद्या ठाकूर यांनी केला आहे.

हा प्रकार जेथे घडला ते रुग्णालय घाटकोपर येथे असून बृहन्मुंबई महापालिकेचे आहे. पालिकेच्या सायन, केईएम आणि कुपर रुणालयात कोरोना रुग्णांच्या शवाची हेळसांड होत असल्याचे व्हिडिओ यापूर्वी उघड झाले हाेते. त्यानंतर पालिका प्रशासनाने आरोग्य विभागास कठोर अशा सूचना दिल्या होत्या.

रुग्णावर पाच तासांत अंत्यसंस्कार करण्याचे बंधन

१. साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ च्या अन्वये कोरोना रग्णाचा मृत्यू झाल्यास ३० मिनीटांत रुग्णाचे शव वाॅर्डातून बाहेर काढण्याचे तर ५ तासांत शवावर अंत्यसंस्कार करण्याचे बंधन आहे.

२. मुंबई महापलिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईतील वाढती कोराेना रुग्णसंख्येमुळे सत्ताधारी सेनेवर मोठी टीका होत आहे. त्यात राजावाडीचा व्हिडिओ समोर आल्यामुळे सेना चांगलीच बॅकफूटवर जाणार आहे.

३. नातेवाईक मृतदेह स्वीकारण्यास पुढे न आल्यास मृतांवर पालिका अत्यंसंस्कार करेल, असे मुंबईच्या महापौरांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात तसे काही घडत नसल्याचे राजावाडीच्या व्हिडिओने समोर आणले आहे.  

बातम्या आणखी आहेत...