आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:घाटकोपरच्या नाल्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह 22 किमी दूर हाजी अली जवळ सापडला, बीएमसी अधिकाऱ्यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला बेपत्ता झाल्याच्या तब्बल 33 तासांनंतर हाजी अलीजवळील समुद्रात तिचा मृतदेह आढळला

मुंबईतील घाटकोपर परिसरात काही दिवसांपूर्वी एक महिला उघड्या नाल्यात पडली होती. या महिलेचा मृतदेह 22 किलोमीटर दूर हाजी अली दर्गाहजवळ अरबी समुद्रात सापडला. घाटकोपरच्या असाल्फा गावातील रहिवासी दामा 3 ऑक्टोबर रोटी संध्याकाळी पिठाच्या गिरणीपर्यंत गेली होती. मुसळधार पावसात अनेक तासांनंतरही महिला न परतल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. दरम्यान तिची बॅग एका उघड्या सापडली. दुसरीकडे महिलेचा मृतदेह हाजी अली जवळ मिळाल्यानंतर बीएमसी अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

घाटकोपर पोलिसांनी सांगितले की, सदरील महिला शनिवारी संध्याकाळी असल्फा येथे नाल्यात पडली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिच्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी नाल्यात पडल्याची शक्यतेवर आसपासच्या नाल्यात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर माहिम, वांद्रे, कुर्ला आणि साकी नाका पर्यंतच्या नाल्यात शोध घेतला. मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही. महिला बेपत्ता झाल्याच्या तब्बल 33 तासांनंतर हाजी अलीजवळील समुद्रात तिचा मृतदेह सापडला.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले

दुसरीकडे बीएमसी अधिकाऱ्यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कारण हाजी अलीकडे अद्याप सीवेज लाइन बनली नाही. याप्रकरणाचा तपास करणारे उपायुक्त संजय दराडे यांच्यानुसार, ड्रेनेज लाइनमध्ये कमीतकमी तीन चोको पॉईंट्स आहेत, जेथे महिलेचा मृतदेह अडकला पाहिजे होता.

तसेच, जर दामा खरोखर घाटकोपर मॅनहोलमध्ये पडली असती, तर तिचा मृतदेह माहीम येथील मिठी नदीत सापडला असता कारण सांडपाण्याची रेषा वरळी नाल्याला जोडलेली नाही. घाटकोपर पोलिसातील वरिष्ठ निरीक्षक नितीन अल्कानुरे म्हटले की, दामा यांनी मॅनहोलमध्ये पडताना कोणीही पाहिले नाही. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.

बातम्या आणखी आहेत...