आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळ:मोक्कातील आरोपीचा मृतदेह आलिशान कारमध्ये सापडला

रायगड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माेक्कातील आराेपी तथा जामिनावर सुटलेल्या संजय कार्ले या गुंडाचा मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ एका कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पॅरोलवर सुटलेला व मूळचा पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील असलेल्या संजय कार्ले याचाच हा मृतदेह असल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला असून दोन दिवसांपासून ही गाडी हायवेवर बाजूला उभी होती. त्यामुळे संशय आल्याने गाडीची तपासणी केल्यावर रायगड पनवेल पोलिसांना गाडीत मृतदेह दिसल्याने मोठी खळबळ उडाली.

मात्र हा मृतदेह कुणाचा याबद्दल नेमका अंदाज येत नव्हता. पण आता हा मृतदेह मोक्कासारखे गुन्हे दाखल असलेल्या संजय कार्ले याचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. संजयवर सोन्याची नाणी विकून फसवणूक करणे आदी काही गुन्हे दाखल आहेत. मात्र ही हत्या गोळ्या झाडून करण्यात आली किंवा कसे, या बाबींचा तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...