आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाअर्थसंकल्प 2022:अर्थ ना संकल्प, भाराभर आकर्षक योजनांची जंत्री, अर्थसंकल्पावर पाटील, गिरीश महाजन, देसरडा, कराड कडाडले

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्वद कोटी लोकांच्या ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी कोणतीही ठोस योजना अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नाही. फसवा अर्थसंकल्प, अर्थ ना संकल्प, भाराभर आकर्षक योजनांची जंत्री, महाराष्ट्रातील जनतेसाठी फक्त आश्वासने दिली आहेत. अशा शब्दात भाजप नेते केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, भाजप नेते, गिरीश महाजन व अर्थतज्ज्ञ तथा राज्य नियोजन मंडळाचे सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी मत व्यक्त केले.

राज्य सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पातून सामान्यांसाठी कोणतीही ठोस योजना नाही. महाराष्ट्र सरकार घोषणा करण्यात नेहमी पुढे असते. पण सामान्यांसाठी कोणतीही ठोस योजना नाही, अशी टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर केली. भाजप नेते गिरीश महाजन यांनीही ठाकरे सरकारचे हे फसवा अर्थसंकल्प असून सामान्यांच्या हाती फारसे काही मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या पदरात घोर निराशा पडली अशा शब्दात त्यांनी टीका केली.

प्रा. देसरडा म्हणाले, विधिमंडळात सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या अर्थव्यवस्थेचे जे चित्र पुढे येत आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. महाराष्ट्र हे देशातील आघाडीच्या राज्यापैकी असून राज्याचे उत्पन्न सर्वाधिक आहे. ३२ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न असलेल्या आपल्या राज्यात दारीद्र, कुपोषण, आत्महत्या, बेरोजारीचा प्रश्न सर्वाधिक आहे. ही गंभीर बाब आहे. अर्थसंकल्पात यावर उपायांसाठी भरीव तरतूद आवश्यक होती परंतू सव्वा चार लाख कोटींहून अधिक खर्चात पगार, निवृती वेतन, मागील कर्जावरील व्याजफेड यातच ७५ टक्के राज्य उत्पन्न फस्त होते. दोन लाख कोटीहून अधिक रक्कम फक्त सरकारी लवाजमा पोसण्यासाठी खर्च होते. त्याखेरीज जे विकास प्रकल्प घेतले ते सुद्धा कंत्राटदार, त्यांचे पाठीराखे व हितसबंध जोपासणाऱ्यांची तुंबडी भरण्यात खर्च होते. सवंग योजनांची जंत्री अर्थमंत्र्यांनी सादर केली अशी टीकाही त्यांनी केली. उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा असा राज्याच्या अर्थसंकल्प आहे. अशी टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे

बातम्या आणखी आहेत...