आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प:मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महानगरपालिकेचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प शनिवारी मुख्यालयात सादर होणार आहे. प्रशासकीय राजवटीतील या अर्थसंकल्पाची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. यंदा अर्थसंकल्पाचे आकारमान ५० हजार कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकिक असलेल्या मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प पालिका अधिनियमानुसार ५ फेब्रुवारीपर्यंत सादर करावा लागतो. दरवर्षी पालिकेच्या नियमानुसार शिक्षण विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यानंतर मुख्य अर्थसंकल्पाचे सादरीकरण होते. अतिरिक्त आयुक्त हे शिक्षण समिती अध्यक्षांना शिक्षण अर्थसंकल्प सादर करतात. पालिका आयुक्त हे स्थायी समिती अध्यक्षांना अर्थसंकल्प सादर करतात. यंदा पालिकेची व नगरसेवकांची मुदत संपलेली असल्यामुळे व अद्याप निवडणूक झालेली नाही त्यामुळे अर्थसंकल्प प्रशासकीय स्तरावरच सादर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...