आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या तीन दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; म्हणाले- विस्ताराला विलंब पण आमच्यात वाद नाही

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या तीन दिवसांमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, असे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केले. मंत्रिमंडळ विस्ताराला काहीसा विलंब झाला आहे, पण आमच्यात कोणत्याही पातळीवर कोणताही वाद नाही. येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करू. मंत्रिमंडळ निवडीत कोणताही भेदभाव नसून संभाव्य मंत्रिमंडळ खूप चांगले असेल, असेही शिंदे यांनी सांगितले.

डाके, जोशींची भेट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची सकाळी भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी माजी मुख्यमंत्री व सेना नेते मनाेहर जोशी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.डाकेंचे योगदान अमुल्य

मुख्यमंत्री म्हणाले, लिलाधर डाकेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो, मी त्यांचे योगदान शिवसेनेत अगदी जवळून पाहिले. बाळासाहेबांसोबत सुरुवाचे नेते होते त्यात डाके यांचा समावेश आहे. शिवसेना वाढवण्याचे काम डाके यांनी केले. आज वाढलेली शिवसेना पाहतो त्यात डाके यांचे योगदान आहे. मंत्रीपद मिळनही त्यांची साधी राहणी आहे. शिवसेनेसाठी त्यांनी सर्वकाही त्यांनी केले.

राऊतांनी स्प्नप्ने पाहावीत

संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ''उद्या महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन झाले तर यात आश्चर्य वाटून घेऊ नका. शिंदे गटातील काही आमदार अस्वस्थ आहेत, त्यांना फसवले गेले. तेच आमदार आता आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ असेल.''

ओबीसी आरक्षणासाठी दिल्लीवारी

मुख्यमंत्री म्हणाले की, राऊतांना जे बोलायचे ते बोलू द्या, त्यांना स्वप्नात राहू द्या पण आम्ही राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ. दिल्लीवारी यासाठीच की, ओबीसी समजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित होते. त्यासाठी कार्य केले. कायदेविषयक बाबींबाबत बैठका घेतल्या. राज्यातील ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम राज्यसरकार करीत आहेत, सुप्रीम कोर्टालाही मी धन्यवाद दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...