आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी आरक्षणावर राष्ट्रवादीचे मंथन:केंद्राने जातीनिहाय जनगणना करावी, एकदाचे सत्य काय ते बाहेर येऊ द्यावे; शरद पवारांचे आवाहन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही. समाजातील मोठ्या वर्गाला आरक्षणाचा आधार देण्याची गरज आहे, पण जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारकडून होईल असे वाटत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते आज मुंबईत राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या ओबीसी आरक्षण राज्यस्तरीय मेळाव्यात बोलत होते.

मागे हटणार नाही

पवार म्हणाले, ''ओबीसी आरक्षण हेच आमचे लक्ष्य असून ती आमची भूमिका आहे. देशात अस्वस्थता आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही.'' असेही पवार म्हणाले.

तोपर्यंत निवडणूका नकोच

पवार म्हणाले, ''राजकीय आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत निवडणूका नकोे अशी भूमिका राष्ट्रवादीची असून महाविकास आघाडी सरकारमधील नेतेही याच भूमिकेसोबत असतील अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.समाजाची उपेक्षा टाळण्यासाठी आरक्षण द्यायलाच हवे.''

आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरुच

पवार म्हणाले, ''जोपर्यंत सन्मानाने आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरुच ठेवण्याची गरज आहे. ओबीसीची जातीय जनगणना करावी, सत्य काय ते बाहेर येऊ द्या अशी अपेक्षाही पवार यांनी केंद्राकडून व्यक्त केली. यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरावे लागेल.''

ओबीसींच्या खांद्याला खांदा

पवार म्हणाले, ''राष्ट्रवादी काॅंग्रेस म्हणून आम्ही भूमिका घेत आहोत त्यासाठीच आम्ही लढणार आहोत. ओबीसी समाजाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे. ज्यांना मंजूर नाही त्यांचा खोडा आहे असे आम्ही समजू.''

आरएसएसचा विरोध

शरद पवार म्हणाले, ''जातीनिहाय जनगणना आरएसएसला मान्य होणार नाही. जोपर्यंत ओबीसी समाज सन्मानाने उभा राहत नाही तोपर्यंत त्यांना सवलतीची गरज आहे. सत्ता असेल नसेल तरीही आम्ही सदैव ओबीसींच्या पाठीशी आहोत.''

राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती

ओबीसी आरक्षणावरून राज्याचे वातावरण तापले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत भाजपने मंत्रालयावर मोर्चा काढला आहे. तर, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने 'राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनाचे' आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, नेते जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे आणि छगन भुजबळ अधिवेशनाला उपस्थित होते.

आरक्षणाशिवाय निवडणूक नाही
मेळाव्यात मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, ''स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होणार नाही. हाच महाविकास आघाडीचा निर्धार आहे.

ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी आम्ही कित्येक दिवस लढत आहोत. पण हा लढा लढण्यासाठी ओबीसी समाज कमी पडतो आहे, असे मत राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी व्यक्त केले. समाजात आम्ही 60- 70 टक्के आहोत, पण न्याय हक्कासाठी लढण्यासाठी पुढे येण्याचे प्रमाण फार कमी आहे. राज्यातील सगळ्या ओबीसी समाजाला एकत्रित करण्यासाठी हे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...