आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:'कारभारात राज्यपालांचा हस्तक्षेप केंद्र सरकारने थांबवावा' : शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली अपेक्षा 

मुंबई 3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते

काही राज्यांत राज्यपालांकडून अधिकाऱ्यांना परस्पर आदेश दिले जात आहेत. यामुळे राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांना समन्वय राखण्यात अडचणी येऊ शकतात. केंद्राने याबाबत योग्य ती काळजी घ्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत अधिकार वापरल्यास ते योग्य राहील, असा सल्ला पवार यांनी दिला.

  • कोरोनानंतर देश-राज्यांत आर्थिक संकट उद्भवल्यास अत्यंत कडक उपाययोजना कराव्या लागणार असून त्यामुळे नियोजनबाह्य खर्चावर कात्री लावावी लागेल.
  • स्थलांतरितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बंद असल्यामुळे बरेचसे लोक जागोजागी अडकून पडले आहेत. केंद्राने स्वयंसेवी संस्थांना हातभार लावावा.
  • आधार-रेशन कार्ड नसलेल्यांकडेही अन्नधान्य पोहोचले पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...