आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत पंढरपुरात दाखल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार शासकीय महापुजा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूजेसाठी सर्व कुटुंब हजर राहणार

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत पंढरपूरला दाखल झाले आहे. मातोश्रीवरुन दुपारी मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरकडे रवाना झाले होते. यावेळी पावसानेदेखील जोरदार हजेरी लावली होती. ते आता पंढरपुरातील शासकीय विश्राम गृहात दाखल झाले आहे. दरम्यान, आज मध्यरात्री मुख्यमंत्री स्वत: ही शासकीय पुजा करणार आहेत.

पूजेसाठी सर्व कुटुंब हजर राहणार
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरला दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित राहतील. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा पार पडणार आहे.

यावर्षी महापूजेचा मान कोलते कुटुंबियांना
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी महाराष्ट्रातील एका कुटुबियांना पुजेचा मान मिळत असतो. यावर्षीचा मान वर्धा जिल्ह्यातील केशव शिवदास कोलते आणि इंदुबाई केशव कोलते यांना मिळाला आहे. ते यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुजाअर्चा करतील. आम्हाला महापुजेचा मान मिळाला आहे त्यामुळे आमच्या कष्टाचं फळ झालं असे कोलते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...