आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:1 जुलैपासून शाळेची घंटा वाजणार, दिवसाआड दोन सत्रांत वर्ग भरणार, ठाकरे सरकारची मंजुरी

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यभरात 1.07 लाख शाळांतील सुमारे 2 कोटी 25 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निर्णय

महाराष्ट्रात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संमती दिली. जुलैपासून शाळांचे प्रत्यक्ष वर्ग भरणार आहेत. दैनंदिन ३-३ तास अशी २ सत्रे होणार असून दिवसाआड वर्ग भरवले जाणार आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोरोनामुळे शिक्षण थांबले तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही. हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरू कराव्यात. तसेच ऑनलाइन डिजिटल पद्धत पायलट प्रोजेक्ट म्हणून तातडीने राबवावी.’

कंटेनमेंट झाेन क्षेत्रात शाळा सुरू करायचा निर्णय पालिका आयुक्त वा जिल्हाधिकारी घेतील. सत्राच्या नियोजनासाठी विदर्भात २६ जून व उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनदरम्यान शाळा व्यवस्थापनांनी बैठका घ्याव्यात, असे सांगितले आहे.

एका बाकावर एक विद्यार्थी : सकाळी ९ ते १२ आणि दुपारी १२ ते ३ अशा दोन सत्रांत शाळा भरवायच्या आहेत. एका वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी, असे वर्गात जास्तीत जास्त २० ते ३० विद्यार्थी बसवावेत. दोन विद्यार्थ्यांत किमान एक मीटर अंतर ठेवायचे आहे.

1. शाळा निर्जंतुकीकरणास मनरेगाचा निधी वापरण्यास ग्रा.पं.ला मान्यता. कोरोना रुग्ण आढळून शाळा बंद झाल्यास आॅनलाइन वर्ग भरवले जातील.

2. पाल्याकडे मास्क व सर्व शैक्षणिक साहित्य स्वत:चे राहील ही काळजी पालकांनीच घ्यावी. होम क्वॉरंटाइन शिक्षकास वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक.

3. जिल्हा प्रशासनाने शिक्षक अाणि मुलांचे थर्मल स्क्रीनिंग करावे. शिक्षकांची कोरोना ड्यूटी रद्द करावी, असेही आदेशामध्ये म्हटलेले आहे.

तिसरी ते १२ वीच्या शाळा उघडणार; पहिली व दुसरीचा निर्णय मॅनेजमेंटकडे

शाळांसाठीचे वेळापत्रक

- ९, १० व १२ वीचे वर्ग जुलैपासून

- ६ ते ८ वीचे वर्ग ऑगस्टपासून

- ३ ते ५ वीचे वर्ग सप्टेंबरपासून

- पहिली ते दुसरी इयत्तांचे वर्ग भरवण्यासंदर्भातला निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घ्यायचा आहे.

- इयत्ता ११ वीचे वर्ग दहावीच्या निकालानंतर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुख्य अट : गावात ३० दिवस रुग्ण नको शाळा सुरू करण्यासाठी संबंधित गावात किमान ३० दिवस कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नसावा, अशी अट शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घातली आहे.

पहिली-दुसरीसाठी ऑनलाइन वर्ग नाही

पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पर्याय दिला जाणार नाही. त्यांच्यासाठी रेडिओ, टीव्ही असे डिजिटल पर्याय वापरायचे आहेत. तसेच या वर्गाच्या शाळांचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घ्यायचा आहे.

ऑनलाइन क्लाससाठी वेळ मर्यादा

एज्युकेशन फ्राॅम होम असलेल्या शाळांच्या तिसरी ते पाचवीच्या वर्गांसाठी प्रतिदिन कमाल १ तास, सहावी ते आठवीसाठी २ तास आणि नववी ते बारावीसाठी प्रतिदिन ३ तास मर्यादा घालून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...