आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून भागणार नाही:राज्याचा दौरा करावा आणि शेतकरी, नूकसानग्रस्तांना भरीव मदत द्यावी- अजित पवार

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री म्हणतात सरसकट पंचनामे करायला सांगितले पण शेतकरी म्हणतात पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून भागणार नाही. त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा करावा, नूकसानग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना भरीव नदत करावी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली.

अजित पवार आज विदर्भ दौऱ्यावर असून गडचिरोलीत त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यावर उपाययोजना व्हायला हव्या. यासह ईतर मागण्या कशा पूर्ण होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत हेही त्यांनी सांगितले.

विदर्भानंतर मराठवाड्यात जाणार

अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना सांगितले की, शेतकरी म्हणतात की, सरकारने रोप आता दिली तर उपयोग नाही, कारण दोन महिने ऋतू पुढे गेला. पावसाळा बंद झाला तर रोपांना पाणी मिळणार नाही. या समस्या जाणून घेण्यासाठीच मी सर्वांना बरोबर घेत पाहणीसाठी आलो. मी गडचिरोलीनंतर चंद्रपूर, वर्धा, नांदेड, बीडमध्येही शेतबांधावर जाणार आहे.

दोघेच कारभारी

अजित पवार म्हणाले, वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पीक आहेत. पाऊस बंद झाल्यानंतर शेतकरी पीक घेत नाहीत त्या-त्या भागात असे प्रश्न आहेत. उद्याच्या अधिवेशनात मी याबाबत आवाज उठवणार आहे हे मी शेतकऱ्यांनाही आश्वासन दिले आहे. मी नागपूरमध्ये सांगितले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच कारभार करीत आहेत.

पालकमंत्र्यांची नेमणूक करा

अजित पवार म्हणाले, शिंदे फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची नेमणूक केली नाही, मंत्रिमंडळ गठीत केले नाही. हे तात्काळ करायला हवे त्यामुळे भर पावसाळ्यात अडचणीवर मात करता येईल आणि शेतकऱ्यांची सोय होईल. याशिवाय आपण पंचनामे अजून का केले नाही कलेक्टरला प्रश्न विचारणार असून कारणेही जाणून घेणार आहोत.

सरसकट पंचनामे झाले नाही

मुख्यमंत्री म्हणतात सरसकट पंचनामे करायला सांगितले पण शेतकरी म्हणतात पंचनामे झाले नाहीत. दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यावर उपाययोजना व्हायला हव्या. यासह ईतर मागण्या कशा पूर्ण होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांनी पीककर्ज काढलेले आहे पण ते ,त्यांना फेडता येणार नाही ते कर्ज माफ करावे, वेळेत कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

सरकारला व्यवहार्य मागण्या करू

अजित पवार म्हणाले, कर्ज तरी माफ करा किंवा कर्जाचे पुनर्गठन करावे, पण पीकच शेतात नाही, नविन आणि जूने कर्ज फेडणार कसे आदी शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. ज्यांचे पीक गेले, त्यावर सरकार काय निर्णय घेणार हे मी सरकारला विचारणार आहे. अव्वाच्या सव्वा नव्हे तर व्यवहार्य मागण्या आम्ही त्यांच्याकडे करु, कारण आम्हालाही सरकारच्या समस्या माहित आहेत.

मुंबईत बसून काम होणार नाही

अजित पवार म्हणाले, तातडीने अधिवेशन घेण्याची गरज आहे. काल मुख्यमंत्र्यांची भेट घेत हे सांगितले. मुंबईत बसुन बघणे अन् पुर्ण जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्त करुन काम करणे सोपे जाते. मुंबईत बसून काम करता येणार नाही. त्यांनी राज्याचा दौरा करण्याची गरज आहे.

ओला दुष्काळ जाहीर करा

अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांची समस्या वेगळी आहे. कच्ची रोपे त्यांना दिली गेली ती सडलेली, कुजलेली आहेत. नॅशनल हायवेचे पावसाने नुकसान झाले. बचावकार्यातही अडथळे येतात. राज्यात पूरस्थिती आहे, शेतकऱ्यांचे नूकसान झाले आहे, त्यामूळे तातडीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

भरीव मदत करा

अजित पवार म्हणाले, ज्यांच्या घराला संपूर्ण ओलावा आला अशांच्या घराचा पंचनामा करावा. शेतकऱ्यांना नूकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचा प्रपंच खरीप पिकांवर अवलंबुन होता पण त्यांचे नूकसान झाले. नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करावी. सर्वांचा साकल्याने सरकारने विचार करावा, शेतकऱ्यांना भरीव मदत करावी नसेल तर केंद्राकडून आणा किंवा कुठुनही आणा फार सल्ला देण्याचे कारण नाही.

दक्षता घेण्याची गरज

अजित पवार म्हणाले, जलसंपदा विभागाला सतत अलर्ट राहावे लागेल. पाणी सोडताना गडचिरोलीला फटका बसणार नाही याची काळजीही घ्यावी लागेल. दोन मोठ्या पाऊसाचे टप्पे येणार हे हवामान खाते सांगत आहेत. त्यामूळे सतर्कही करावे लागेल. मनुष्यहानीही झालेली आहे.

बातम्या आणखी आहेत...