आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्‍हणाले:मनसेच्या वाटेला गेल्याने मुख्यमंत्रिपद गेले

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या नादाला कुणी लागायला नको. माझ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल केल्यामुळे अडीच वर्षांत मुख्यमंत्रिपद गेले, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला. ‘माझ्या अयोध्या दौऱ्याला ज्यांनी विरोध केला त्यांचे काय झाले?’ असा सवाल करत ठाकरेंनी खा. बृजभूषण सिंह यांनाही टोला मारला.

गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापन दिन हाेता. त्यानिमित्त ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज बोलत होते. संदीप देशपांडंेवर जो हल्ला त्यावर मी बोललो नाही. मात्र, माझ्या मुलांचे रक्त वाया घालणार नाही. आधी ज्याने हल्ला त्याला कळेल व मग सर्वांना कळेल, असेही ते म्हणाले.

भरती-ओहोटी येत असते, भाजपने लक्षात ठेवावे प्रत्येक पक्षाच्या इतिहासात भरती-ओहोटी आलेली आहे. ६५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे? त्यामुळे आज भरती आहे, उद्या ओहोटी येणार हे भाजपने लक्षात ठेवावे. मशिदीवरील भोंग्यांचा समाचार मी येत्या गुढीपाडव्याला घेईन, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला.

बातम्या आणखी आहेत...