आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी अ‍ॅनालिसिस:रोहितच्या जोडीदार निवडीचा पेच, सामने न खेळता करणार निवड, वर्ल्डकपपूर्वी पाक खेळणार 7 सामने; भारत एकही नाही

मुंबई (ऋषिकेश कुमार)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय संघाने खेळला होता मार्च महिन्यात शेवटचा टी-२०

आगामी आयसीसी टी-२० विश्वचषकाला आता अवघ्या ४० दिवसांचा कालावधी उरला आहे. येत्या दाेन दिवसांत भारतीय संघाची या विश्वचषकासाठी घाेषणा हाेणार आहे. मात्र, यासाठी सध्या निवड समितीसमाेर माेठा पेच निर्माण झाला आहे. कारण, काेणत्याही सरावाशिवाय निवड समितीला या विश्वचषकासाठी राेहित शर्माच्या सलामीला जाेडीदार फलंदाज निश्चित करावा लागणार आहे. १७ अाॅक्टाेबरपासून यूएई-अाेमानमध्ये विश्वचषकाला सुरुवात हाेणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडिया एकही टी-२० सामना खेळणार नाही. सध्या टीम इंडिया काेहलीच्या नेतृत्वात इंग्लंड दाैऱ्यावर कसाेटी मालिका खेळत आहे. टीम इंडियाने मार्च महिन्यात शेवटचा टी-२० सामना खेळला हाेता.

दरम्यान, १९ सप्टेंबरपासून यूएईमध्येच आयपीएलच्या उर्वरित ३१ सामन्यांना सुरुवात हाेणार आहे. स्पर्धेसाठी अवघ्या ४० दिवसांचा कालावधी टीम इंडियाच्या हाती आहे. त्यामुळे विशेष पद्धतीने संघाची निवड केली जाणार आहे. कारण, आयपीएलमध्ये काही खेळाडू सहभागी झाले नाहीत. त्यामुळे मंडळाच्या निवड समितीसमाेर माेठा पेच निर्माण झालेला आहे.

न्यूझीलंड ,पाकची तयारी: खास मालिका आयाेजित
भारतीय संघाला आगामी टी-२० विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंड टीमविरुद्ध सामने खेळावे लागणार आहेत. हे दाेन्ही संघ सध्या या विश्वचषकाची जाेमात तयारी करत आहेत. या विश्वचषकापर्यंत हे दाेन्ही संघ जवळपास प्रत्येकी सात सामने खेळणार आहेत. यासाठी न्यूझीलंडने खास पाकचा दाैरा आयाेजित केला. दाेन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका हाेणार आहे.

राेहितसाेबत काेण करणार अाेपनिंग
इंग्लंडविरुद्ध मार्च महिन्यात झालेल्या टी-२० सामन्यात राेहित आणि विराट ही भारताची सलामीची जाेडी हाेती. राहुलची सुमार खेळी चिंतेचा विषय हाेती. सूर्यकुमार यादव हा तिसऱ्या स्थानी खेळला हाेता. या सामन्यानंतर आता यापुढेही सलामीला उतरणार असल्याची प्रतिक्रिया काेहलीने दिली हाेती. त्यामुळे आताही ताे याच भूमिकेत उतरण्याची शक्यता आहे. भारताकडे सलामी जाेडीदारासाठी राहुल, धवन व पृथ्वीचा पर्याय आहे.

बातम्या आणखी आहेत...