आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोशनी शिंदे मारहाण प्रकरण:रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाच्या अहवालावर आयोग असमाधानी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी पोलिस निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालाबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी (६ एप्रिल) असमाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे याप्रकरणी आता ठाणे पोलिस आयुक्तांना मंगळवारी आयोगाच्या कार्यालयात हजर राहून अहवाल सादर करण्याचे आदेश रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

ठाणे येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या रोशनी शिंदे यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. याप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना तातडीने अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार कासार वडवली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी याप्रकरणी अहवाल सादर केला होता.