आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Congress Delegation Met Fadnavis To Re create The Ward Structure Of Mumbai; A Political And Judicial Battle Will Be Fought For It Deora

मुंबईची वार्ड रचना पुन्हा नव्याने करा:अन्यथा राजकीय, न्यायालयीन लढाई लढू- देवरांसह काँग्रेस शिष्टमंडळाची फडणवीसांकडे मागणी

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात जात भेट घेतली आहे. यावेळी मुंबई प्रभाग रचना बदलावी अशी मागणी केली असल्याचे पत्रकार परिषद घेऊन केली आहे. या वार्ड रचनेतून केवळ एकाच पक्षाचा फायदा होणार आहे असा आरोप त्यांनी केला आहे. मुंबई मनपाची निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरत असते, त्यामुळे जनतेला पारदर्शक निवडणूक हवी आहे. यावेळी काँग्रेसचे मिलिंद देवरा, काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी, आणि विरोधीपक्ष नेते यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

काय म्हणाले मिलींद देवरा?

यासाठी आम्ही राजकीय, आणि न्यायालयिन दोन्ही लढे देणार आहोत, रवी राजा आणि आमदार भाई जगताप यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर निवडणूक आयोगालाही पत्र लिहले आहे. अशी माहिती मिलिंद देवरांनी दिली आहे. मुंबईत 227 वार्ड रहावे असेही त्यांनी म्हटले आहे. यातून कुणाचा फायदा आहे, हे सर्वांना माहिती आहे. मात्र एका पक्षाने त्यांच्या सोयीयाठी ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये तीन नगरसेवकांचा एक प्रभाग आहेत.

रवी राजाचे पत्र?

प्रभाग पुनर्रचना करण्यात येणार का, यावरून राजकीय पक्षांमध्ये अटकळी बांधल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर रवी राजा यांनी निवडणूक आयोगाकडे एका पत्राद्वारे विचारणा केली होती. त्याला आयोगाने उत्तर दिले आहे. पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करून त्यावर हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...