आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई महापालिका निवडणूक 2022:मुंबई मनपा स्वबळावर; काँग्रेसचा प्रत्येक वाॅर्डात ‘जनता दरबार’

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • “माझी मुंबई, माझी काँग्रेस’‌ हा काँग्रेसचा नारा आहे

सन २०२२ मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या उद्देशाने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या सर्वच्या सर्व २२७ वाॅर्डांमध्ये १०० दिवस जनता दरबार घेण्यात येणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांनी सांगितले की, मुंबईत काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्न, समस्या सोडवण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येणार आहे. सर्वच्या सर्व २२७ वाॅर्डांतील नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा हा प्रयत्न असेल. “माझी मुंबई, माझी काँग्रेस’‌ हा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? असा सवाल मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पुढील १०० दिवसात प्रत्येक वॉर्डात जाऊ. तिथे जनता दरबार करु, लोकांची काम करु, त्यानंतर वरिष्ठांना २२७ जागा का लढायच्या हे सांगू, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...