आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारीनंतर देशात आर्थिक व्यवहारांनी वेग घेतला आहे. या दृष्टीने गरज पूर्ण करण्यासाठी एसबीआयसारख्या मोठ्या चार-पाच बँकांची देशाला गरज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
बँकांची सर्वोच्च संघटना इंडियन बँक असोसिएशनच्या (आयबीए) ७४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. उद्योगांची वाढती गरज लक्षात घेऊन देशात सर्व आर्थिक केंद्रांवर किमान एक प्रत्यक्ष किंवा डिजिटल बँकिंग असायला हवे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती सुधारण्यासाठी केंद्राने दोन टप्प्यात बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतल्याने चांगली मदत झाली, असे सीतारमण म्हणाल्या.
एनएआरसी बॅड बँक नाही : नॅशन अॅसेट रिकन्स्ट्रकशन कंपनीला (एनएआरसी) बॅड बँक ठरवले जाऊ शकत नाही. अमेरिकेत हे संबोधन वापरले जाते. निर्यातीचे ४०० अब्ज डॉलर हे लक्ष्य गाठण्यासाठी बँकांना प्रत्येक उद्योगांची गरज ओळखता आली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
बँकिंग सुविधेसाठी ऑप्टिक फायबरचा उपयोग करावा
देशात अनेक जिल्ह्यांत उलाढाल चांगली असली तरी बँकिंग सुविधांचा अभाव असलेल्या जिल्ह्यांत बँकांनी शाखा स्थापन कराव्यात. देशात ७.५ लाख पंचायतींच्या क्षेत्रातील दोन तृतीयांश भाग ऑप्टिक फायबर नेटवर्कने जोडला गेला आहे. त्याचा उपयोग असंघटित क्षेत्रांना बँकिंग सुविधा देण्यासाठी केला जाऊ शकतो, असे त्या म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.