आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरू होणार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे दिली सरकारने जबाबदारी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपवण्याची सूचना केली होती त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळणार आहे.

पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, कीर्तन, प्रवचन, तत्त्वज्ञान आदी बाबींशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यासाठी संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडे ५ वर्षांसाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत जे लवकर होईल त्या काळासाठी सोपवण्याचा निर्णय काही अटींच्या अधीन राहून घेण्यात आला आहे. यासाठीचा खर्च विद्यापीठाला स्वनिधीतून करावा लागणार असून संतपीठाच्या जागेची तसेच इमारतीची मालकी शासनाकडेच राहील. फक्त शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी ही इमारत विद्यापीठाकडे सोपविण्यात आली आहे.

या संतपीठाची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा १९५० नुसार करण्यात आली असून यासाठी ज्ञानेश्वर उद्यानाजवळ १७.८ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. संतपीठाच्या प्रशासकीय इमारत, वसतिगृह आणि वाचनालय इमारत बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चासदेखील मान्यता देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...