आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य:कोर्टाची याचिकाकर्त्यास विचारणा, राज्यपालांना बोलण्यापासून न्यायालय कसे रोखणार?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी दाखल याचिका ‘जनहित’ याचिका कशी होऊ शकते, असा सवाल करून राज्यपालांना बोलण्यापासून रोखणारे आदेश न्यायालय कसे देऊ शकते, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यास केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरुद्ध महाभियोगाची कारवाई सुरू करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते दीपक मावळा यांनी दाखल केली आहे. राज्यपालपदाची प्रतिष्ठा घालवणारी अशी अवमानकारक, वादग्रस्त वक्तव्ये करण्यापासून राेखण्याची मागणी याचिकेत केली आहे. मावळा यांचे वकील नितीन सातपुते यांच्या विनंतीवरून गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या.अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वकिलांनी बाजू मांडल्यानंतर राज्यपालांना बोलण्यापासून रोखण्याचे आदेश न्यायालय कसे देऊ शकते अशी उलट विचारणा न्या. दत्ता यांनी केली. याप्रकरणी पुढील सुनावणीची तारीख अद्याप दिलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...