आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरण:आरोपीला फाशीची शिक्षा सुनावत न्यायालय म्हणाले, अशा प्रकरणात कठोर शिक्षा आवश्यक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुंबईतील दिंडोशी न्यायालयाने मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावली आहे. गुरुवारी (ता. 2) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

30 मे रोजी ठरवले होते दोषी

यापूर्वी 30 मे रोजी न्यायालयाने 45 वर्षीय मोहन चौहानला बलात्कार आणि त्यानंतर केलेल्या खून प्रकरणात दोषी ठरवले होते. या प्रकरणाचा निकाल राखून ठेवत बुधवारी 1 जूनला शिक्षा निश्चित करण्याच्या मुद्द्यावर युक्तिवाद केला होता.

पीडितेच्या शरीराचे हाल

न्यायमूर्तींसमोर बुधवारी हे प्रकरण आले असता, राज्य सरकारच्या वकिलांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने वकिलाची मागणी मान्य केली आणि सांगितले की, आरोपीने पीडितेच्या शरीराचे खूप नुकसान केले आहे.

आरोप ढसाढसा रडला

सप्टेंबर 2021 मध्ये पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे मोहन चौहानला दोषी ठरवले
सप्टेंबर 2021 मध्ये पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे मोहन चौहानला दोषी ठरवले

सुनावणीदरम्यान कोर्टाने आरोपी मोहनला दोषी ठरवले आणि मग किती शिक्षा करायची, असा सवाल मोहनला केला. तेव्हा तो जोरजोरात रडू लागला. या प्रकरणात आपल्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचे मोहन रडत सांगत होता. त्याचवेळी आरोपीच्या वकिलाने घटनेनंतरही पीडिता जिवंत होती आणि तिला चांगले उपचार मिळाले असते तर ती वाचू शकली असती असे म्हटले.

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईतील साकीनाका परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर मोहनने बलात्कार करून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला होता. या घटनेनंतर महिला गंभीर जखमी झाली. पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले, तेथे तिचा मृत्यू झाला. आरोपी हा व्यवसायाने चालक होता. एका रिपोर्टनुसार, कोर्टात सुनावणीदरम्यान आरोपीने पीडितेच्या वकिलांना शिवीगाळ केली. तेव्हा वकिलाने सांगितले की, यात सुधारणेला वाव नाही.

बातम्या आणखी आहेत...