आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नोंदणीचे निकष बदलले:मतदार नोंदणीसाठी वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यासंबंधीचे निकष आता बदलले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • , जानेवारीसह एप्रिल, जुलै, ऑक्टोबरची1 तारीख गृहीत धरणार

मतदार नाेंदणीसाठी निवडणूक आयोगाने अर्हता वाढवली आहे. आतापर्यंत १ जानेवारी रोजी किंवा त्या दिवसापर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्यांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्या आधी ज्या नागरिकांना वयाची १८ वर्षे पूर्ण होतील त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी बुधवारी िदली.

नोटाचा प्रचार बेकायदा : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज गुरुवारी मतदान आहे. या निवडणुकीच्या प्रचारात काही जणांनी नोटाचा पर्याय वापरावा, असा प्रचार सुरू केला असल्याची तक्रार शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता देशपांडे यांनी असा प्रचार बेकायदा असल्याचे सांगितले. मतदान करताना ‘नोटा’ (वरील पैकी एकही नाही) चा पर्याय वापरणे किंवा न वापरणे हा सर्वस्वी त्या मतदाराचा वैयक्तिक अधिकार तसेच निर्णय असतो, असे ते म्हणाले.

अंधेरीत पूर्वसाठी आज मतदान अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचे आज गुरुवारी मतदान होत आहे. येथे उद्धव गटाच्या ऋतुजा लटके या किती मताधिक्याने विजयी होणार याची उत्सुकता आहे. येथे भाजपने माघार घेतली आहे. सात उमेदवार रिंगणात आहेत.

बातम्या आणखी आहेत...