आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांचा पटोलोंवर पलटवार:म्हणाले- पाठीत खंजीर खुपसला हेडलाइनसाठी ठीक; नाना काँग्रेसमध्ये कुठून आले सर्वांना माहीत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मागे कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते सर्वांना माहीत आहे. नाना पूर्वी काँग्रेसमध्ये होते, तिथून भाजपत गेले, भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. कशाला बोलायचे. झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी. पाठीत खंजीर खुपसला वगैरे हेडलाइनसाठी ठीक असते,’ या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात गुरुवारी पवार यांचा जनता दरबार पार पडला. त्यानंतर प्रसारमाध्यमंाशी ते बोलत होते. नुकत्याच पार पडलेल्या भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद सभापती निवडणुकांदरम्यान आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद चव्हाट्यावर आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावरून अजित पवार यांनी पटोलेंना टोला लगावला. राज्यस्तरावर शरद पवारांनी बैठक घेतली होती. त्यात आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवायची असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण जिल्हा स्तरावर वेगळे प्रश्न असतील तर स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांना काही प्रमाणात मुभा देण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

माझ्यावर टीका करून सत्य झाकता येणार नाही : पटोले
मुंबई ‘आघाडीचा लिखित करार मोडून राष्ट्रवादीने भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे, असा सवाल करून माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला आणि राज्याला माहीत आहे. माझ्यावर टीका करून सत्य झाकता येत नाही,’ अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...