आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षांची तारीख:आरोग्य विभागाच्या स्थगित झालेल्या परीक्षेची तारीख झाली जाहीर, राजेश टोपेंनी दिली माहिती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला.

आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेतली जाणारी परीक्षा ही रद्द झाली होती. परीक्षेच्या एक दिवस आधीच ही परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. त्रास सहन करावा लागल्याने विद्यार्थी वैतागलेले होते. आता ही रद्द झालेली पदभरतीची परीक्षा 15-16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

अचानक रद्द करण्यात आलेल्या परीक्षेविषयी राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ही परीक्षा अचानक रद्द करण्यात आली कारण यामागे काही उमेदवारांने हित हा मुद्दा होता. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच आर्थिक फटका देखील बसला होता.

याविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले, आज मुंबईमध्ये आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल. या बैठकीमध्ये या तारखा निश्चित करण्यात येतील. 15 व 16 ऑक्टोबरला रेल्वेची परीक्षा आहे ती पुढे ढकलता आली तर प्राधान्य म्हणून याच तारखेला परीक्षा घेण्यात येतील. जर पुढे ढकलता नाही आली तर 22 किंवा 23 ऑक्टोबरला परीक्षा होईल अशी माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...