आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Decision Of Alliance With MNS Will Be Discussed With The Central Government, Raj Thackeray Will Meet And Discuss In 2 3 Days Chandrakant Patil

भाजप-मनसे युतीच्या चर्चा:मनसे सोबत युतीचा निर्णय केंद्र सरकारशी बोलणी करुन घेणार, राज ठाकरेंची 2-3 दिवसात भेट घेऊन चर्चा करणार - चंद्रकांत पाटील

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज ठाकरे म्हणाले होते मी क्लिप पाठवलेली नाही

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष युतीच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान नाशिक दौऱ्यावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. यानंतर या चर्चांना बळकटी मिळाली. मात्र राज ठाकरेंनी या चर्चा फक्त मीडियामध्येच सुरू असल्याचे म्हणत वृत्त खोडून काढले होते. मात्र आता यावर चंद्रकांत पाटलांनी पुन्हा भाष्य केले आहे. येत्या 2-3 दिवसात राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत याविषयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 'परप्रांतीय बाबत राज ठाकरे यांच्या क्लिप मी ऐकली आहे. माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहे. याबाबत राज ठाकरे यांच्याशी 2-3 दिवसात भेट घेऊन चर्चा करणार आहे. मनसे सोबत युतीचा निर्णय केंद्र सरकारशी बोलणी करून घेण्यात येईल' असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'राज ठाकरे हे मला आवडणारे राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. ते बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात. त्यांनी मला क्लिप पाठवली आहे. ती मी ऐकली. एकदोन दिवसांमध्ये माझी राज ठाकरेंशी भेट होईल. माझ्या मनातील प्रश्न त्यांच्यासमोर मी मांडणार आहे, तसेच युतीमुळे देशाच्या राजकारणावर पडसाद उमटणार आहेत. आता युती ऑन दी स्पॉट होणार नाही. केंद्राची परवानगी घेणार आहे' असे पाटील म्हणाले आहेत.

राज ठाकरे म्हणाले होते मी क्लिप पाठवलेली नाही
भाजप आणि मनसेच्या युतीविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच होत आहे. चंद्रकांत पाटील यांना मी कोणतीही व्हीडिओ क्लिप पाठवलेली नाही. त्या प्रकारची क्लिप मी पाठवेल असे बोललो होतो पण मी ती पाठवली नाही. त्यांना दुसरीकडून कुठून तरी ही क्लिप मिळाली. याची माहिती घ्यावी लागेल. नाशिकमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भेट झाली. तिथे अनेक विषयांवर आमची चर्चा झाली. यामध्ये हासुद्धा एक विषय होता. मी त्यांना म्हणालो, मुळात पहिल्यांदा माझे भाषण युपी-बिहारच्या नागरिकांना कळाले. मात्र तुम्हाला कळाले नाही. मी काय बोललो ते तुम्हाला पाठवून देतो. पण ते पाठवायचे राहून गेले होते.

माझ्या भूमिका स्पष्ट - राज ठाकरे
दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनीही भाजप आणि मनसे युतीवर भाष्य केले होते. 'राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करु असे ते म्हणाले होते. यावर राज ठाकरेंनी म्हटले की, 'भूमिका स्पष्ट काय करायच्या, माझ्या भूमिका या स्पष्ट आहेत. मी आतापर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या अगदी स्पष्ट आहेत. या सर्व महाराष्ट्र हिताच्या भूमिका आहेत. त्यासोबतच देशहिताच्या सुद्धा भूमिका मी मांडलेल्या आहे.'

बातम्या आणखी आहेत...