आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

तिढा सुटणार?:विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात 13 अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत शनिवारी ऑनलाइन बैठक झाली

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सोमवारी १२ वाजेपर्यंत पहिला निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्रालयात शनिवारी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात झूमच्या माध्यमातून १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत ऑनलाइन बैठक झाली. विद्यार्थ्यांची परीक्षेसंदर्भातील मानसिकता लक्षात घेऊन कमीत कमी संसाधनांमध्ये आणि सहज सोप्या पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची रविवारी बैठक होणार असून ही समिती कुलगुरू व प्राचार्यांशी चर्चा करणार आहे.