आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:महाविद्यालये उघडण्याचा निर्णय प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या हाती; कुलगुरू तयार, संघटनांशी चर्चा करण्याची मंत्र्यांची सूचना

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालये कधी उघडणार यासंदर्भात ४० लाख महाविद्यालयीन विद्यार्थी आतुर झालेले आहेत. त्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्यासमवेत राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठांच्या कुलगुरूंची सोमवारी बैठक झाली. मात्र प्रथम प्राध्यापक व कर्मचारी संघटनांशी कुलगुरूंनी चर्चा करावी. त्यांचे मत लक्षात घ्यावे, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. महाविद्यालये उघडण्यासदंर्भात एक आराखडा तयार करण्यात येईल. तो राज्याच्या आपत्ती निवारण व्यवस्थापन विभागाला पाठवण्यात येईल. त्या विभागाची संमती मिळाल्यानंतर महाविद्यालये उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सामंत म्हणाले.

कोरोनामुळे राज्यातील महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्था २३ मार्चपासून बंद आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) महाविद्यालये उघडण्यासंदर्भात कृती मानके बनवून सर्व राज्यांना पाठवली आहेत. त्याचे पालन करत इतर राज्यातील महाविद्यालये उघडली गेली आहेत. मात्र महाराष्ट्रातील शाळा उघडल्या तरी महाविद्यालये अजून कडीकुलपातच आहेत. सोमवारी त्यासंदर्भात सामंत यांनी अकृषक विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली. यात २० कुलगुरू सहभागी झाले होते. त्यांनी महाविद्यालये उघडण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली. मात्र ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही वर्ग भरवल्यास कामाचे तास वाढतील. त्यास प्राध्यापक व कर्मचारी संघटना विरोध करतील, अशी भीती मंत्री उदय सामंत यांनी बैठकीत व्यक्त केली.

५० लाख आरटीपीसीआर चाचण्यांची गरज
महाविद्यालये सुुरू करण्यापूर्वी राज्यातील ४ हजार महाविद्यालये आणि २ हजार उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी आणि प्राध्यापक- कर्मचारी मिळून ५० लाख आरटीपीसीआर कोरोना चाचण्या कराव्या लागणार आहेत. त्याची काय तयारी आहे, तसेच वसतिगृहात विद्यार्थ्यांमध्ये फिजिकल डिस्टन्स कसे राखायचे, त्यासंदर्भात मंत्र्यांनी कुलगुरूंना विचारणा केली.

बातम्या आणखी आहेत...