आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईटी:सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शिक्षण विभागाची तयारी; मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली होती परीक्षा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 ऑगस्ट रोजी राज्यभरात सीईटी प्रत्यक्षात (ऑफलाइन) पद्धतीने होणार होती.

अकरावी प्रवेशासाठी यंदा घेण्यात येणारी सीईटी (राज्य सामाईक प्रवेश परीक्षा) मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. मात्र त्याविरोधात शालेय शिक्षण विभाग सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी हालचाली करत आहे. बुधवारी शिक्षण विभागाची मंत्रालयात बैठक झाली. त्यात उच्च न्यायालयाच्या निर्णयास आव्हान देण्यावर चर्चा झाली.

२१ आॅगस्टला सीईटीचे नियोजन होते. त्यामुळे न्यायालयात आव्हान देण्यासाठी शिक्षण विभागाकडे पुरेसा अवधी नाही. परिणामी शालेय शिक्षण विभाग कोंडीत सापडला आहे. मात्र, बुधवारच्या बैठकीत विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड कोणत्याही निष्कर्षापर्यंत आल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. २१ ऑगस्ट रोजी राज्यभरात सीईटी प्रत्यक्षात (ऑफलाइन) पद्धतीने होणार होती.

वास्तविक, सीईटी घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे होते. मात्र परीक्षांच्या नियोजनासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे. एकूण २१ परीक्षा ही परिषद घेते. मग, सीईटी शिक्षण मंडळाकडे का सोपवण्यात आली, असा सवाल काही अधिकारी आता करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...