आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांकडून उत्तर नाही:हक्कभंग नोटीसवर खुलासा करण्याठीची मुदत संपली; आता पुढे काय कारवाई होणार?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘विधिमंडळ नसून हे बनावट शिवसेनेचे चोरमंडळ आहे’, या वक्तव्याने वाद ओढावून घेणारे खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग नोटीसवर कुठलाही खुलासा दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

विधिमंडळ अधिवेशनात संजय राऊत यांच्या वक्तव्याने सरकारच्या हाती आयतेच कोलीत मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही बॅकफूटवर यावे लागल्याचे पाहायला मिळाले.

राऊतांचे शब्द काय?

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, डुप्लिकेट शिवसेनेने माझे पद काढले तरी फरक पडत नाही. संसदीय नेतेपदावरून मला काढले तरी हरकत नाही. मुळात ती शिवसेना डुप्लिकेट आहे. त्यांचे विधिमंडळ नव्हे चोरमंडळ आहे. पद गेले तरी चालेल, आमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे.

हक्कभंगाचा प्रस्ताव

संजय राऊत यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, हा सत्ताधाऱ्यांचाच नव्हे, तर संपूर्ण विधानमंडळाचा अपमान आहे. उद्धव ठाकरे हेसुद्धा याच विधिमंडळाचे सदस्य आहेत, मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार का?, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच भाजप व शिवसेनेच्या आमदारांनी दोन्ही सभागृहांत राऊतांच्या वक्तव्याचा निषेध करून अटकेची मागणी केली करत हक्कभंग प्रस्तावही मांडला.

हक्कभंग समितीची स्थापना

हक्कभंग प्रस्ताव मांडल्यानंतर विधानसभेने तातडीने हक्कभंग समिती स्थापन केली. त्यात राहुल कुल, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नीतेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाट, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, नितीन राऊत, सुनील केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल या आमदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात ठाकरे गटाच्या एकाही आमदाराला स्थान दिलेले नाही.

पुढे काय होणार?

संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली. त्यांना 48 तासांमध्ये उत्तर द्यायचे होते. त्यावर शुक्रवारी सायंकाळपर्यंत राऊत यांना खुलासा सादर करण्याची मुदत होती. ती संपली असून, राऊत यांनी अजूनही लेखी उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर पुढे काय कारवाई होणार, याची उत्सुकता आहे. शक्यतो राऊत यांना पुन्हा एकदा स्मरण पत्र पाठवले जाईल. त्यानंतरही उत्तर मिळाले नाही, तर पुढे काय पावले उचलली जातील, ते पाहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...