आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या दिवसांपासून आमच्याकडे बहुमत:शिंदे गटाचा दावा; यात धक्का काय, सुप्रीम कोर्टात बाजू मांडू - आदित्य ठाकरे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्या दिवसांपासून आमच्याकडे बहुमत आहे, असा दावा मंगळवारी शिंदे गटाने केला. तर आजचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून धक्का काय, असा सवाल अनिल देसाई यांनी केला. तर आजचा निर्णय शिंदे गटाला दिलासा नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात बाजू मांडू, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्चच न्यायालयात सुनावणी झाली. आता शिवसेना पक्षचिन्हाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. तर शिंदे गटाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर नेतेमंडळीच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगतोय की, आमच्याकडे 2/3 बहुमत आहेत. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आता निवडणूक आयोगाकडे देण्यात आला आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये सहानूभुती निर्माण करण्याच्या दृष्टीने काहीतरी कारणे सांगून निर्णय पुढे ढकल्यासाठी सुप्रीम कोर्टाला आधार मातोश्रीने घेतला आहे. कोर्टाने आज मोठी चपराक उद्धव ठाकरे यांना दिली असून, अखेर विजय सत्याचा होणार, नवरात्रोत्सवामध्ये हा प्रसादच समजेल, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.

लढाई सुरूच राहणार

कोर्टाच्या निर्णयावर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, आज सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा युट्युबवर थेट प्रक्षेपण दाखवले. सर्वांनी पाहिले की, कपिल सिंब्बलांनी जे मुद्दे समोर ठेवले, ते ऐकूण घेतल्यानंतर सर्वाच्च न्यायालयाने धनुष्यबाणाबाबत निवडणूक आयोगाकडे निर्णय दिला आहे. आमची लढाई सुप्रीम कोर्टात सुरूच राहील.

उद्धव ठाकरेंना उत्तर

उद्धव ठाकरे यांची याचिका फेटाळणे म्हणजे एका अर्थाने त्यांना मिळालेले उत्तर आहे. आजचा निर्णय अतिशय योग्य पद्धतीने झाला आहे. सर्वांनीच त्याचे स्वागत केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिली आहे.

राज्यभर फटाके वाजवणार

आज कोर्टाने दोघांची सत्य बाजू ऐकूण घेतली. त्यामध्ये निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत. आमच्याकडे किती बहुमत आहे आणि उद्धव ठाकरेंकडे किती बहुमत आहे हे आम्ही दाखवून देऊ. आज संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे गटाकडून फटाके वाजवले जातील. आम्ही आतापासूनच जल्लोष सुरू केला आहे. अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

हा धक्का नाही

कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटाला हा धक्का मानला जातो. त्यावर बोलताना शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले की, यात धक्का काय? कोर्टात चांगला युक्तीवाद झाला. कोर्टामध्ये आज चांगल्याप्रकारे मुद्दे मांडण्यात आले. पक्षामध्ये काही शहानिशा असले तर त्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. निवडणूक आयोगाच्या ज्या गोष्टी लागतील त्याची आम्ही पूर्तता करू. आयोगाकडे यापुढे आता आमचे वकील मुद्दे मांडतील.आयोगाची लढाई जिंकण्याची आमची तयारी पूर्ण असल्याचेही देसाई म्हणाले.

आम्हाला आशा आहे

धनुष्यबाणाच्या सुनावणीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. जो काही निर्णय होईल. तो येणाऱ्या सर्व विषयांसाठी पायंडा ठरणार आहे की, पुढे अशा प्रकारच्या घटना जर इतर राज्यात झाल्या तर काय होऊ शकते. निवडणूक आयोग हे केंद्राच्या अखत्यारीत येते. त्यामुळे पुढे काय होणार याचे अंदाज लावणे फार कठीण आहे. तरीपण आम्ही ही लढाई लढतोय. निवडणूक आयोगसमोर आम्ही सर्व मुद्दे मांडणार असून, आयोग नक्कीच आमचे म्हणणे ऐकेल अशी आम्हाला आशा आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनीषा कायंदे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...