आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी मोर्चा:शेतकऱ्यांना राज्यपालांच्या पूर्वनियोजित दौऱ्याची कल्पना दिली होती; राजभवनाकडून स्पष्टीकरण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करुन मुंबई दाखल झाले. परंतु, राज्यभवनावर राज्यपाल गैरहजर असल्यामुळे शिष्टमंडळाला निवेदन फाडून निषेध केला. परंतु, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे 22 तारखेला लेखी परवानगी मागितली होती. तर, राज्यपाल हे गोव्यात असल्याने भेटू शकणार नाही, असे लेखी कळवण्यात आले होते.

कृषी कायद्याच्या विरोधात दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यातील शेतकऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले. यानंतर शेतकरी राजभवनाच्या दिशेने रवाना झाले. मात्र, राज्यपाल एका कार्यक्रमासाठी गोव्याला रवाना झाले होते. यामुळे शेतकरी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याची पाहायला मिळाले. शेतकरी हे राज्यपालांना भेटणार हे राज्यपालांना माहिती असूनही ते गोव्याला पळून गेले असा आरोप संतप्त आंदोकलांकडून करण्यात आला. दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिर‍िक्त कार्यभार आहे. ते सोमवारी गोवा विधान सभेच्या प्रथम सत्राला संबोध‍ित करणार असल्याने राज्यपाल महोदय त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राजभवनाकडून आधीच सांगितले असल्याचे समोर आले आहे.

संयुक्त शेतकरी मोर्चाच्या वतीने 22 जानेवारी रोजी राजभवनावर एक पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात 25 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी भेट द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. परंतु, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पूर्वनियोजित कार्यक्रमास्तव गोवा राज्यात असल्यामुळे शिष्टमंडळाला भेटू शकणार नाही, असे उत्तर राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी 24 जानेवारी रोजी दिली होते.