आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:झेंडा मागे दिसतोय, मग मुख्यमंत्री सॅल्युट कोणाला मारताय? CBI दिसली की काय ? निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आज 74 वा स्वातंत्र्य दिवस देशभरात साजरा होत आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच ध्वजारोहण सोहळा होता. या ध्वजारोहण सोहळ्याचे काही फोटोज समोर आले आहेत. या फोटोवर आता निलेश राणेंनी टीका केली आहे. झेंडा मागे दिसतोय मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सॅल्युट कोणाला मारताय, सीबीआय दिसली की का? असा खोचक सवाल निलेश राणेंनी विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांच्या ध्वजारोहणाच्या फोटोवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी त्यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहणाचे फोटो शेअर केले आहेत. यावर झेंडा मागे आहे मग मुख्यमंत्री सॅल्युट कोणाला मारतायं असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे समोर CBI दिसली की काय, असं म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

सध्या सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण चांगलंच तापलं आहे. आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. दरम्यान सीबीआयचा तपास मुंबई पोलिसांकडेच ठेवावा असा राज्य सरकारचा आग्रह आहे. मुंबई पोलिस सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम असल्याचे राज्य सरकारचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...