आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘परम’कथा:अँटिलिया प्रकरणातील चार कथा, सर्वांचा आहे एकमेकांशी संबंध; आरोप : परमबीर यांचे अंडरवर्ल्डशी संबंध

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले. दोन दिवसांत त्यांच्यावरही आरोप झाले. पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांच्याकडून हे आरोप झाले. डांगे यांनी फेब्रुवारीत राज्याच्या अतिरिक्त गृह सचिवांना पत्र लिहिले होते. यात परमबीरसिंग यांच्या अंडरवर्ल्डशी संबंधांचा खुलासा केला होता. त्यांनी लिहिले होते...

माजी पोलिस आयुक्त परमबीर यांच्यावर निरीक्षक डांगेंचे आरोप
‘जेव्हा मी २२ नोव्हेंबर २०१९ ला ब्रीच कँडीतील डर्टी बन्स सोबो क्लब बंद करायला गेलो, तेव्हा त्याचे मालक जितू नवलानी यांनी मला धमकावले. त्याने डीजी, अँटी करप्शन, परमबीरसिंग यांच्याशी संबंधांचा हवाला दिला. त्या रात्री तेथेच चित्रपट फायनान्सर भरत शहांचा नातू यश मेहताने एका कॉन्स्टेबलशी गैरवर्तन केले. त्याबाबत गुन्हा दाखल आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये परमबीर पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी नवलानीविरोधात आरोपपत्र दाखल न करण्याचे आदेश दिले. त्यांची मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यासमोर मोती महल इमारतीतील फ्लॅटमध्ये नवलानीसोबत भेट झाली. हा फ्लॅट शार्दूल सिंग याने भाड्याने घेतला आहे. तो परमबीरचा भाऊ असल्याचा दावा करतो. परमबीर व नवलानी यांचे वाधवा बंधूंशीही जवळचे संबंध आहेत. त्यांना काळ्या पैशांशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. हे प्रकरण अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंधित आहे.

‘सत्ता-वीर’: प्रज्ञाची अटक ते एल्गार परिषदेपर्यंत, आणि आता पुढे...
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या मागील कामाबाबतही अनेक कथा समोर आल्या आहेत. त्यातील एकानुसार, परमबीर पहिल्यांदा २००८ मध्ये चर्चेत आले. तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते आणि परमवीर एटीएसमध्ये अतिरिक्त आयुक्त होते. तेव्हा त्यांनी मालेगाव स्फोटप्रकरणी साध्वी प्रथा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला अटक केली. तेव्हापासून काँग्रेस नेत्यांनी ‘हिंदू दहशतवाद’ चा मुद्दा उपस्थित केला.

दुसऱ्या कथेनुसार, भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परमबीर यांना २०१५ मध्ये ठाण्याचे पोलिस आयुक्त केले. त्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी पुण्यातील एल्गार परिषदप्रकरणी पाच आरोपींना अटक केली. तेव्हापासून भाजप नेत्यांनी ‘शहरी नक्षली’ चा मुद्दा उचलला.

तिसरी कथा, फडणवीस सरकारने २०१९ मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय बर्वे यांचा कार्यकाळ तीन महिने वाढवला. तेव्हा संतापून परमबीर यांनी घरी येऊन काचेची भांडी फाेडली होती. ते सहकाऱ्यांसोबत बोलताना नेहमीच मुंबई पोलिस आयुक्त होण्याच्या इच्छेबाबत बोलायचे.

दावा : सट्टेबाजाच्या सिमकार्डांद्वारे हिरेन हत्येचा झाला उलगडा
महाराष्ट्र पाेलिसांच्या दहशतवादी पथकाने (एटीएस) ठाण्यात कार डेकोरेशन व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर ‘अँटिलिया’ समोर २० जिलेटिनच्या काड्यांसह सापडलेली स्कॉर्पिओ कार हिरेनजवळच होती. या घटनेमागील एटीएसने जी कथा सांगितली, त्यानुसार...

‘एक खासगी कंपनी सुरक्षा संस्था सुरू करणार आहे. सचिन वाझे आणि काही वरिष्ठ पोलिस अधिकारी या संस्थेत भागीदारीच्या अपेक्षेत होते. बहुतेक यामुळेच त्यांनी अंबानींच्या घराच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच हिरेनची हत्या झाली. यात नाव येऊ नये म्हणून वाझे त्या रात्री खूप उशिरापर्यंत हॉटेलची चौकशी करत होते. तिकडे, कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि इतर मोहीम फत्ते करत होते. सट्टेबाज नरेश गोरही यात सहभागी होता. त्याने गुजरातहून काही सिमकार्ड घेतले होते. खासगी फोनऐवजी सर्व याच सिमकार्डांद्वारे एकमेकांशी बोलायचे. यातीलच एका सिमवरून हिरेनला रात्र ८.२० ला कॉल गेला होता. त्यातून उलगडा झाला.

वाझे-सत्य : रितेशवरही खटला दाखल केला आहे
अँटिलिया स्फोट प्रकरणात मुंबई पोलिसातील अधिकारी सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात असून निलंबित आहे. ते २००३ मध्येही ख्वाजा युनूस नावाच्या गुन्हेगाराच्या पोलिस कोठडीतील मृत्यूच्या आरोपात निलंबित झाले होते. परमबीरसिंग यांच्यामुळेच ते २०२० मध्ये पोलिस सेवेत परतले होते. दरम्यान, वाझे यांनी इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या कौशल्याचा वापर केला. ‘डायरेक्टबात’ नावाने मेसेजिंग अॅप तयार केले. गुगलसारखे ‘इंडियन पीपल डायरेक्ट्री’ नावाने सर्च इंजिन सुरू केले. मराठीत फेसबुकसारखे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ‘लई भारी’ सुरू केले. याच नावाने अभिनेता रितेश देशमुखने मराठी चित्रपट बनवल्याने त्याच्याविरोधात २०१४ मध्ये खटला दाखल केला. दोन पुस्तके- ‘जिंकून हरलेली लढाई’, ‘द स्काऊट’ देखील लिहिली.

बातम्या आणखी आहेत...