आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांचे निलंबन:भाजपच्या आमदारांना निलंबित करण्यासाठी सरकारने खोटी स्टोरी रचली, विरोधीपक्ष नेते फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजप संघर्ष सुरूच ठेवणार

विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. मात्र पहिल्याच दिवशी अधिवेशनात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरा-समोर आले. तसेच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की पाहायला मिळाली. विरोधक आमदारांनी अध्यक्षांचा माईकही ओढला. या गैरवर्तनानंतर आज भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. आता यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर भाजपने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि सभात्याग केला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे खोटी स्टोरी रचून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले असल्याचे फडणवीस म्हणाले.

106 आमदारांना निलंबित केले तरीही लढा देत राहू

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती. ती शंका सरकारने खरी केली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडे पाडले आहे. या मुद्द्यावरुन सरकार अपयशी ठरले असल्याचे आम्ही सरकारला दाखवले यामुळेच त्यांनी खोटी स्टोरी रचून खोटे आरोप लावून 12 आमदरांना निलंबित केले आहे. तसेच ओबीसींसाठी 12च आमदार काय आम्ही 106 आमदारांना निलंबित केले तरीही लढा देत राहू, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजप संघर्ष सुरूच ठेवणार
जोपर्यंत ओबीसीचे आरक्षण पुन्हा दिले जात नाही तोपर्यंत भाजपचा संघर्ष सुरूच राहणार नाही. एक वर्ष नाही पाचही वर्ष आमचे या ठिकाणी सदस्यपद रद्द झाले तरीही आम्हाला काळजी नाही. आज सभागृहात जे पाहिलं, अनेक वेळा लोक यापूर्वी मंचावर चढले आहे. मात्र कधीही कुणाला निलंबित करण्यात आलेले नाही. नेहमीच अध्यक्षांच्या दालनात बाचाबाची होते. मात्र कधीही कुणी निलंबित केले जात नाही. परंतु स्पष्टपणे सांगतो, स्टोरी तयार करुन हे निलंबन करण्यात आले आहे. भाजपच्या एकाही सदस्याने शिवी दिलेली नाही आणि शिवी कोणी दिली हे देखील सर्वांनी पाहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...