आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड:सरकार अल्पमतात, मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मागणी

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सरकार अल्पमतात आलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली आहे. राज्यसभेवर निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करत सिंधुदुर्ग जिल्हा भाजपकडून जल्लोष करण्यात आला. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती होती.

राणे म्हणाले की, ‘शिवसेनेची स्वत:ची मते त्यांच्या उमेदवाराला मिळालेली नाहीत, तर संजय राऊत फक्त एका मताने पराभूत होण्यापासून वाचले. महाविकास आघाडीचे आठ ते नऊ आमदार फुटले आहेत. याचाच अर्थ सरकार अल्पमतात आले आहे. बहुमतासाठी १४५ आमदारांचे पाठबळ लागते. त्यांच्याकडे तेही नाही. उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

राऊतांना किंमत देत नाही : खासदार शरद पवार यांनी भाजप नेत्यांचे े कौतुक केले होते. त्यावरून नारायण राणे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना टोला लगावत म्हटले की, ‘मी संजय राऊत यांना काहीही किंमत देत नाही, त्यांनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावं.’

बातम्या आणखी आहेत...