आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महत्त्वाची बैठक:राज्यातील चित्रपट, नाट्यगृहेसुरू करण्यास शासन सकारात्मक, थिएटर्स ओनर्सनी घेतली अमित देशमुखांची भेट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी थिएटर्स ओनर्सना चर्चेदरम्यान सांगितले.

देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मल्टिप्लेक्स स्क्रीन ओनर्स आणि सिंगल स्क्रीन ओनर्स, थिएटर ओनर्स, फिल्म स्टुडिओ ओनर्स असोसिएशनसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. सध्या राज्यात अनलॉक-५ चा टप्प्यात सिनेमागृहे व नाट्यगृहे बंद राहणार आहेत. दसरा, दिवाळी, नाताळ या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात त्यामुळे याच काळात सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत असते.

सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे सुरू कशी करता येतील याबाबत आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहोत, असेही देशमुख यांनी सांगितले. येणाऱ्या काळात सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरू करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले.