आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्रिमंडळ बैठक:राज्यभरात नावीन्यपूर्ण कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण सरकार राबवणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटक खासगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.

कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे २ भाग या धोरणात असून यामुळे राज्यातील निसर्गसौंदर्याचा लाभ सहजपणे पर्यटकांना घेता येईल. तसेच रोजगारदेखील वाढेल. पर्यटन संचालनालयाकडे कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक राहील. कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क व्यावसायिकांना पर्यटन संचालनालयामार्फत मार्केटिंग, स्वच्छता, व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच त्यांची प्रसिद्धीदेखील करण्यात येईल. पर्यटकांना राहण्याची सुविधा तसेच खासगी गुंतवणुकीसही प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक सहलींचे आयोजन, हॉटेल्स आणि रिसॉर्ट या पारंपरिक निवास व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव, ना विकास क्षेत्राचा योग्य वापर, दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार आहे.

काय आहे कॅरॅव्हॅन पार्क : यामध्ये मूलभूत सोयी-सुविधांनी युक्त अशा जागेवर कॅरॅव्हॅन पार्क उभी करून मुक्काम करता येईल. यामध्ये लहान मोठ्या आकाराच्या कॅरॅव्हॅन उभ्या करता येतील. असे पार्क खासगी किंवा शासकीय जमिनीवर स्वत: जमीनमालक किंवा विकासक उभारू शकतील. वाहनतळाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा तसेच स्वतंत्र पाणी, रस्ते व वीज जोडणी असेल. या ठिकाणी पर्यटक सुविधा केंद्र, उद्यानदेखील असेल. या ठिकाणी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहेदेखील असतील व विकलांगांसाठीही व्हीलचेअर सुविधा असतील.

कौशल्य विद्यापीठ स्थापणार; सहा ठिकाणी विभागीय केंद्रे : उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण व्हावे या उद्देशाने राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत खर्चापोटी दरवर्षी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. यासंदर्भातील विधेयक २०२१ विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. .राज्यात ६ विभागीय ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याचे ही प्रस्तावित आहे. ही ६ केंद्रे विद्यापीठाची विभागीय केंद्रे म्हणून काम पाहतील.

परिवहन आयुक्तांकडे नोंदणी
परिवहन आयुक्तांकडे या कॅरॅव्हॅनची नोंदणी करावी लागेल. पार्कची नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे करावी लागेल. तसेच टूर ऑपरेटरची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर करता येईल. यासाठी नोंदणी शुल्क ५ हजार व नूतनीकरणासाठी २ हजार रुपये शुल्क असेल.

बातम्या आणखी आहेत...