आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारचा मोठा निर्णय:सरकार राज्यात राज्यात करणार 6 हजार शिक्षण सेवक पदांची भरती, वित्तमंत्री अजित पवारांनी दिली परवानगी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गणित, विज्ञान शिक्षकांचा तुटवडा दूर होईल : मंत्री वर्षा गायकवाड

गेली अनेक वर्षे स्थगित असलेली सरकारी शिक्षक भरती करण्याचा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र ही शिक्षक भरती थेट नसून ती शिक्षण सेवक अशी असणार आहे.

मे महिन्यात राज्याच्या वित्त विभागाने सर्व प्रकारच्या सरकारी नोकरभरतीस कोरोना संसर्ग साथीचे कारण देत स्थगिती दिली होती. ३ डिसेंबर रोजी एका बैठकीत वित्तमंत्री अजित पवार यांनी शिक्षण सेवकांची ६ हजार पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण आयुक्तांना ७ डिसेंबर रोजी एक पत्र पाठवले असून शिक्षक पद भरतीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. शिक्षण सेवकांची ३ वर्षांसाठी नियुक्ती असून प्राथमिकच्या सेवकांना मासिक ६ तर माध्यमिकच्या शिक्षण सेवकांना मासिक ८ हजार ठोक वेतन दिले जाते. राज्यात सन २००० मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शिक्षण सेवक ही पद्धत आणली. फडणवीस सरकारच्या काळात शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल मंत्री विनोद तावडे यांनी आणले. या पोर्टलमध्ये घोळ आहे, अशी टीका काँग्रेस-राष्ट्रवादी सातत्याने करत आली आहे. आता त्याच पोर्टलद्वारे भरती होणार आहे.

गणित, विज्ञान शिक्षकांचा तुटवडा दूर होईल : मंत्री वर्षा गायकवाड

राज्यातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची रिक्त पदे असून विशेषतः गणित व विज्ञान शिक्षकांचा मोठा तुटवडा आहे. तो आता दूर होईल, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser