आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाने लाही लाही:राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार, अनेक ठिकाणी पारा 43 अंशाच्या पुढे​​​​​​​, अकोल्यात देशातील उच्चांकी तापमान

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात उन्हाचा चटका अजूनही कायम आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणेही नागरिकांना कठिण होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 43 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारी घराबाहेर पडणे टाळावे. काही काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोद झाली आहे. आजदेखील राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विदर्भात सर्वाधिक तापमान
राज्यात विदर्भ व त्यानंतर मराठवाड्यात सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. चंद्रपूर, अकोला येथे तापमानाचा पारा 43 अंशांच्या पुढे, तर वर्धा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, धुळे, परभणी येथे तापमान 42 अंशांच्या पुढेच आहे. महाराष्ट्रात आता उष्णतेची लाट ओसरली असली तरी उन्हाचा चटका कायम राहिल, असे केंद्रीय हवामान विभागाने म्हटले आहे. तर, राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, गुजरात राज्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात उद्या ढगाळ वातावरणाचा अंदाज
दक्षिण मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा 42.2 कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज (ता. ४) विदर्भात तर उद्यापासून (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यातच दक्षिण अंदमान समुद्रावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे या भागात गुरुवारपर्यंत (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे.

राज्यात याठिकाणी सर्वाधिक तापमान

  • अकोला - 43.5, चंद्रपूर - 43.4, सोलापूर - 42.8, वर्धा - 42.4, यवतमाळ - 42.2, परभणी - 42.2, अमरावती - 42, धुळे - 42, औरंगाबाद - 40, सोलापूर - 42, नाशिक - 38.7, महाबळेश्वर - 32.9
बातम्या आणखी आहेत...