आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामानाचा अंदाज:विदर्भात पुढील 5 दिवस, मराठवाड्यात 2 दिवस राहणार उष्णतेची लाट; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाच्या झळांनी राज्यातील नागरिक त्रस्त झालेले असतानाच मराठवाड्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहिल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, विदर्भात ही लाट पाच दिवस राहिल, असेही भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे. मराठवाडा व विदर्भात उन्हाचा चटका कायम असताना कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मात्र उद्या वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशभरात उन्हाच्या झळा
राज्यासह देशभरात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. उन्हाच्या चटक्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही असह्य होत आहे. राज्यात अकोला, नगर, मालेगाव, जळगाव, अमरावती, बुलडाणा, नगर येथे तापमानाचा पारा 43 अंशांच्यावर गेला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह जम्मू, झारखंड, दक्षिण पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्यप्रदेश छत्तीसगढमध्येही पुढील काही दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने आहेत. तळकोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. मंगळवारी (ता. 5) कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. गुरूवारी हा कमी दाबाचा पट्टा राज्याच्या कोकण किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तळकोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...