आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाशी झाली तरी चालेल, पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण होऊ देणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी तुरुंगातून जामिनावर बाहेर येताच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
माझ्या अटकेवेळी पोलिसांची हतबलता दिसून आली. शिवाजीराजेंची होणारी बदनामी रोखण्याचा आम्ही गुन्हा केला का, असा सवाल आव्हाड यांनी केला.
चित्रपटातून इतिहासाचे विद्रुपीकरण सुरू
शिवाजी राजेंना नरसिंहाच्या अवतार दाखवल्याने त्यांच्या चातुर्याला धक्का लागला आहे. महिलांचा बाजार भरत होता, असा खोटा इतिहास हर हर महादेव चिटपटात दाखवला आहे. याचे काहीच ऐतिहासिक पुरावे नाही असे सांगताना महाराजांनी माणसांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तरीही तसे दाखविण्यात आले आहे. असे म्हणत शिवाजी महाराजांच्या इतिहासला ठेच पोहचत आहे. बाजूप्रभू त्यांच्या विरोधात होते हे दाखवत बाजीप्रभू देशपांडेच्या इतिहासाला धक्का लावत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शिवरायांच्या नावाखाली पुरदरेंचे विचार पुढे करणाऱ्यांचा टप्प्यात कार्यक्रम करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
डीसीपी दबावत होते - आव्हाड
महाराष्ट्राला दाखविण्यासाठी घाईगडबडीने अटक करण्यात आली, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आम्ही काहीही करू शकतो हे दाखविण्यासाठी आम्हाला अटक करण्यात आली. आम्हाला काल पोलिस ठाण्यात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला, प्रेक्षकाला आम्ही मारहाण केली नाही हे त्यांनेच स्पष्ट केले आहे. तरीही मला अटक करण्यात आली, यामागे कोण आहे. हे स्पष्ट करण्याची गरज नाही ते सर्वांना माहिती आहे. गडकरी, पुंरदरे, यांचे नावे जेम्स लेन यांनी म्हटले होते. पोलिसांचा यात काहीच दोष नाही त्यांच्यावर दबाव होता असा आरोप आव्हाडांनी केला आहे.
महाराष्ट्रातले पाटील बायकांची विक्री करतात हे दाखवून मराठीविरुद्ध मराठा वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठ्यांचे शौर्य कमी करण्याचा, दाबण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. देशपांडे यांच्याबद्दल काहीतरी चुकीचा इतिहास दाखविला आहे. शिवाजीमहाराजांना महिलांबद्दल आदर नसल्याचे दाखविण्यात येत आहे, हे चुकीचा इतिहास आम्ही सहन करणार नाही. ऐतिहासिक संदर्भ नाही अशी प्रकरणे चित्रपटात दाखवायची आणि महाराष्ट्राचा इतिहास चुकवायचा हे आम्ही सहन करणार नाही. यासाठी मला फाशी झाली तरी चालेल पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण होऊ देणार नाही असेही आव्हाडांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.