आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Husband Took His Last Breath In His Chair Saying "Jai Maharashtra" After Finishing His Speech In The Campaign Meeting For His Wife's Sarpanch Post.

दिव्य मराठी विशेष:पत्नीच्या सरपंचपदासाठी घेतलेल्या प्रचारसभेत भाषण संपवून "जय महाराष्ट्र’ म्हणत पतीने घेतला खुर्चीमध्ये अखेरचा श्वास

लातूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीच्या सरपंचपदासाठी घेतलेल्या प्रचारसभेत “जय महाराष्ट्र’ म्हणत पतीने अखेरचा श्वास घेतला. ही घटना लातूर जिल्ह्यातील मुरूडमधील असून याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या पत्नीच्या प्रचारसभेत भाषण संपवून खुर्चीवर बसताच पतीने आपला प्राण सोडला. या घटनेनंतर गाव आणि जिल्हाभरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्यातील मुरूडमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू आहे. प्रचाराची रंगत आलेली असताना प्रचारसभेत भाषण झाल्यानंतर अमर नाडे हे खुर्चीवर बसले. या वेळी छातीत दुखत असल्याचे त्यांनी स्टेजवरच पत्नीच्या कानात सांगितले. मात्र, काही कळायच्या आत त्यांची प्राणज्योत मालवली. अमर नाडे यांच्या पत्नी अमृता नाडे या मुरूडच्या सरपंचपदासाठी निवडणूक लढवत आहेत. बुधवारी सायंकाळी पत्नीच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाषण संपल्यानंतर नाडे यांच्या छातीत कळ निघाली. या वेळी स्टेजवर एकच गोंधळ उडाला. यानंतर उपस्थितांपैकी काही जणांनी नाडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अचानक निधनाने अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत काकांविरोधात उभे केले पॅनल लातूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुुरुड ग्रामपंचायतीमध्ये नाडे काका-पुतण्याची गेल्या काही वर्षांपासून सत्ता आहे. मात्र, यंदा अमर नाडे यांनी काका दिलीप नाडे यांच्या विरोधात पॅनल उतरवले होते. या वेळी काकांच्या विरोधात प्रचार करत असताना त्यांनी दिलीप नाडेंवर जोरदार हल्लाबोल केला. जवळपास २५ मिनिटे भाषण केल्यानंतर त्यांनी “जय महाराष्ट्र’ म्हणत आपले भाषण संपवले. मात्र, हा जय महाराष्ट्र त्यांच्यासाठी अखेरचा ठरला. नाडे हे अतिशय मनमिळावू होते. त्यामुळे त्यांच्या अचनाक निधनाने अनेकांना धक्का पोहोचला आहे.

बातम्या आणखी आहेत...