आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पर्धा परीक्षा:वयोमर्यादेत एक वर्ष वाढ देण्याचा विचार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांची माहिती

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 26 एप्रिल रोजी असणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 स्थगित

लाॅकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा पात्र वयाची मुदत संपणाऱ्या परीक्षार्थींना एक वर्ष वाढवून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घालणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी सांगितले.

सामंत म्हणाले की, २६ एप्रिल रोजी असणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० स्थगित केली आहे. तसेच १० मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित अधिकारी व गट ब संयुक्त परीक्षा रद्द लांबणीवर टाकली आहे. शेवटची संधी असलेल्या हजारो परीक्षार्थींना पुढच्या वर्षी परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे त्यांना एक वर्ष संधी वाढवून द्यावी, असा प्रस्ताव आपण मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. त्यांच्या संमतीनंतर हा विषय नक्की मार्गी लागेल, असे सामंत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...