आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ॲनालिसिस:455 दिवसांपासून भारतीय महिला संघाने खेळला नाही वनडे सामना

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दक्षिण आफ्रिका संघ मार्चमध्ये भारत दौऱ्यावर; येथे 5 वनडे व 3 टी-20 सामने खेळणार

भारतीय महिला संघाने मार्च २०२० मध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. एकदिवसीयचा विचार केल्यास संघाने अखेरचा सामना ६ नोव्हेंबर २०१९ रोजी खेळला. म्हणजे ४५५ दिवसांपासून संघाने एकही एकदिवसीय सामना खेळला नाही. ही दशकातील आतापर्यंतची सर्वात मोठी विश्रांती ठरली आहे.

आता दक्षिण आफ्रिका संघ मार्चमध्ये भारतीय दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळवले जातील. मालिकेची तारीख व ठिकाण अद्याप घोषित करण्यात आले नाही. त्यामुळे याच मालिकेतून यजमान भारताच्या महिला संघाला वनडे सामन्याच्या निमित्त्याने दीर्घ विश्रांतीनंतर मैदानावर उतरण्याची माेठी संधी आहे. त्यामुळे ही मालिका महिला संघाच्या खेळाडूंसाठी पर्वणीच ठरणारी आहे.

२००० : पुरुष संघाने ९१८, महिलांनी खेळले २६० सामने
जानेवारी २००० पासून भारतीय संघांनी खेळलेल्या सामन्यांच्या आलेखात महिला टीम मागे आहे. पुरुष संघाने तिन्ही प्रकारांत ९१८ व महिलांना २६० सामने खेळण्याची संधी मिळाली. पुरुष संघाला ३.५ पटीने अधिक सामने खेळण्यास मिळाले. गतवर्षी महिला आयपीएलमध्ये केवळ ४ सामने खेळवण्यात आले.

मुख्य करार निधीत १४ % अंतर :
पुरुष व महिला खेळाडूंना मिळाल्या निधीत देखील फरक आहे. पुरुष गटात अ+ गटातील खेळाडूंना ७ कोटी मिळतात आणि महिला अ गटातील खेळाडूंना ५० लाख मिळतात. म्हणजे दोन्ही गटांतील अव्वल खेळाडूंमध्ये १४ टक्के फरक आहे. अ गटात पुरुषांमध्ये ५ कोटी, ब गटात ३ कोटी व क गटात १ कोटी रुपये दिले जातात. महिलांमध्ये ब गटात ३० लाख व क गटातील खेळाडूंना १० लाख रुपये मिळतात.

संघ २००५ व २०१७ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरीत :
भारताचा महिला संघ एकदिवसीय विश्वचषकात शानदार कामगिरी करत आहे. २००५ व २०१७ मध्ये संघ अंतिम फेरीत दाखल झाला. दोन्ही वेळा संघ उपविजेता ठरला. दुसरीकडे, २०२० टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये संघाने प्रवेश केला. तेव्हा, संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. एकूणच संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहे.

४ वेळा ३००+ दिवस रेस्ट; वनडेची संधी मिळाली नाही
संघाला वनडे खेळण्यासाठी दीर्घ काळ प्रतीक्षा लागण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी २००० ते २००२ मध्ये, २००३ मध्ये, २००९-१० आणि २०१३-१४ मध्ये संघाला वनडेसाठी ३०० पेक्षा अधिक दिवस प्रतीक्षा करावी लागली. महिला गटात कसोटी कमीच होतात. टी-२० सामने सुरू झाले. कर्णधार मिताली आता टी-२० खेळत नाही. वनडे नसल्याने तिला फिटसेन कायम ठेवण्यासाठी अडचण येत आहे.

बातम्या आणखी आहेत...