आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद:'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटक सरकारने विसरु नये', कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा राऊतांकडून समाचार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिकडे कुणी काहीही बरळले तरी आम्हाला फरक पडत नाही

'असे येडे बरळत असतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटकच्या सरकारने आता विसरु नये. तिकडे कुणी काहीही बरळले तरी आम्हाला फरक पडत नाही' असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

'कर्नाटकचा प्रश्न केवळ एका राज्यापुरता मर्यादित नाही. तर हा दोन राज्यांतील सीमाप्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना समजले पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घ्यायला हवा. तसेच आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरु नये. तिकडे कुणी काहीही बरळले तरी आम्हाला फरक पडत नाही' असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

याविषयी संजय राऊत पुढे म्हणाले की, 'मुंबई महाराष्ट्रामध्ये जे कानडी बांधव राहतात, आम्ही त्यांच्यावर कोणतीही सक्ती केलेली नाही. त्यांना येथे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. यासोबतच येथे कानडी शाळाही चालवतो, कानडी शाळांना अनुदान दिले जाते, कानडी संस्थादेखील चालवल्या जातात. मात्र बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? असा सवालही संजय राऊतांनी केला आहे. यासोबतच ही लढाई आपली भाषा संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा असे कधीही कोणाला सांगितलेले नसल्याचेही राऊत म्हणाले.

पुढे राऊत म्हणाले की, 'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा मुंबईमध्ये यावे, महाराष्ट्रात यावे आणि त्यांच्या कानडी बांधवांसोबत चर्चा करावी. येथे ते उद्योग क्षेत्र, हॉटेल क्षेत्रात जे कामे करत आहेत, हे सर्वजण आमचेच आहेत. उद्या त्यांच जर मतदान घेतले इथे, तर ते देखील सांगतील की बेळगाव महाराष्ट्रामध्येच आले पाहिजे'

काय म्हणाले होते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादाविषयी बोलत असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचाच भाग आहे असे वक्तव्य केले होते. बेळगाव हे अखंड कर्नाटकाचा अभिवाज्य अंग आहे. महाराष्ट्रातील नेते कितीही ओरड करत असले तरी चंद्र-सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असे ते म्हणाले होते. सवदी यांच्या विधानाचा संजय राऊत यांनी आज समाचार घेतला.